भाजप खासदार रामदास तडस यांच्यावरील आरोप प्रकरणात ट्विस्ट; सकाळी कौंटुबिक हिंसेचे आरोप, संध्याकाळी लग्न
भाजप खासदार रामदास तडस यांच्यावरील आरोप प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे.रामदास तडस यांची सून पूजा तडस हिने सकाळी कौंटुबिक हिंसेचे आरोप केले होते. त्यानंतर संध्याकाळी पंकज तडस आणि पूजा तडस यांचा वैदिक पद्धतीने विवाह पार पडला. राष्ट्रवादीचे सर्व आरोप राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप रामदास तडस यांनी केला.