Tunisha Sharma Mother : तुनिषा शर्माच्या आईने आज पत्रकार परिषद घेत आरोपी शिझान खानवर आरोप केले
वसई पोलिसांनी शिझानची कोठडी वाढवण्याची न्यायालयात मागणी करताना काही घटनांची माहिती दिली. शिझाननं तुनिषाला सेटवर मारलेली चापट, तिला उर्दू शिकवण्याचा केलेला प्रयत्न आणि तिला हिजाब परिधान करण्याची केलेली सूचना या प्रकरणात त्याचा जबाब नोंदवायचा असल्याचं न्यायालयाला सांगितलं. तुनिषानं २४ डिसेंबरला आत्महत्या करण्याआधी काही वेळ शिझानशी बातचीत केली होती. त्यानंतर तो लगेच शूटवर गेला आणि तुनिषा शिझानच्या पाठोपाठ गेटपर्यंत गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आलं आहे. त्यावेळी तुनिषा आणि शिझानमध्ये काय बोलणं झालं याचाही पोलिसांना तपास करायचा आहे
Tags :
Suicide Set Cctv Footage Vasai Police Urdu Tunisha Shizans Custody Court Demand Hijab Wearing