Corona Effect | तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद, पूजा सुरु राहणार
तुळजाभवानीचं मंदिर आज पहाटे ५ वाजता विधिवत पूजा करुन दर्शनासाठी बंद करण्यात आलं. सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि मंदिर संस्थाननं घेतलाय. या निर्णयामुळं तुळजाभवानीची चैत्र पौर्णिमेची यात्राही रद्द करण्यात आलीय.