Tuljapur : तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला सुरूवात,देवी निद्रस्त असल्यानं मंदिर बंद : ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला सुरुवात झालेय. काल तुळजाभवानी मातेला चांदीच्या पलंगावर निद्रिस्त करण्यात आलं. धुपारती करून घुगऱ्यांचा नैवेद्य देवीला दाखवण्यात आला. यावेळी मंदिराचे पुजारी, महंत, मंदीर कर्मचारी हे सर्वजण उपस्थित होते. त्यानंतर प्रक्षाळपूजा करून मंदिर बंद करण्यात आलं. मंचकी निद्रा कालावधीत कुलधर्म कुलाचार करणे वर्ज्य असल्यानं या काळात मंदिरात भक्तांची संख्या कमी असते. मंदिराचे पुजारी देखील या काळात गादी-उशीचा त्याग करून केवळ सतरंजीवर विश्रांती करतात
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Solapur Marathi News ABP Maza Top Marathi News Temple Tuljapur ताज्या बातम्या Tulja Bhavani ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtra Maza