Tuljapur Rain : तुळजापूर येथे अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Continues below advertisement
Tuljapur Rain : तुळजापूर येथे अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान तुळजापूर, लोहारा, उमरगा आणि धाराशिव तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय.
सायंकाळी पाचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसल्याने नळदुर्ग, अणदूर परिसरातील झाडे उन्मळून पडली तर अनेकांच्या घरावरील पत्रे देखील उडून गेले. अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर उमरगा तालुक्यातील सात शेळ्या आणि इतर तीन जनावरांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली.
Continues below advertisement