TOP 50 Superfast News : बातम्यांचं अर्धशतक : 12 NOV 2025 : ABP Majha
Continues below advertisement
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर बाहेर असलेला आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर याने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वादळ निर्माण झाले आहे. या पक्षप्रवेशावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे, तर खासदार ओमराजे निंबाळकर आणि इतरांनीही तीव्र टीका केली आहे. 'आरोपींच्या पक्षप्रवेशासाठी भाजपने नवीन मशीन आणलं आहे,' अशी टीका काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. याशिवाय, परळी नगरपरिषदेसाठी मुंडे बहीण-भावांची युती आणि सांगलीत दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षाची झालेली हत्या यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडींचाही आढावा घेण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement