Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीच्या दानपेटीत 354 हिरे, 15 वर्षानंतर दानाचं मोजमाप ABP Majha
Continues below advertisement
तुळजाभवानी मंदिराकडे ६४ कोटींचे सोने….तुळजाभवानी मंदिरातील २०६ किलो सोन्याचे मोजमाप आणि मुल्यांकन आज संपले. २४ कॅरेटचे १०६ किलो सोने निघाले आहे. त्याचं बाजार मुल्य ६४ कोटी रूपये आहे. तीन राज्यांतील… महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रमधील भाविकांनी २००९ ते २०२३ पर्यंत अर्पण केलेल्या सोन्याची नोंद मंदिर समितीकडे होती. परंतु, त्याच्या बाजार मुल्याची माहित नव्हते. या सोन्याशिवाय ४ हजार किलोपेक्षा अधिकची चांदी मंदिराकडे आहे. त्याचे मुल्यांकन लवकर होणार आहे. आज मोजताना ३५४ हिरे आणि हिऱ्यांचे २४ कॅरेट मंगळसूत्र आढळून आले आहे. त्याचं बाजारमुल्य होणं बाकी आहे.
Continues below advertisement