Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता ?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता ? सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंविरोधातील कारवाईत ३ वर्षांत प्रगती का झाली नाही? असा सवाल करत माहिती आयोगाच्या नागपूर विभाग खंडपीठाने मुख्य सचिवांचं लक्ष वेधलंय. यामुळे तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं बोललं जातंय. नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना तुकाराम मुंढेंवर महापालिकेतील महिलेने गंभीर आरोप केले होते. तसंच नागपूरमध्ये कंत्राटदाराला नियमबाह्य मदत केल्याचा मुंढेंवर आरोप आहे. या दोन्ही तक्रारींबद्दल कुठलीच प्रगती न झाल्याने भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती. त्याला योग्य उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी माहिती आयोगाकडे अपील दाखल केलं होतं. त्या संदर्भात माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी प्रकरणाची दखल घेत मुख्य सचिवांनी यात लक्ष घालण्याचे आदेश काल दिलेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola