ABP Majha Headlines : 09 PM : 30 July 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अमेरिकेकडून भारतीय उत्पादनांवर २५ टक्के आयात शुल्क लागू करण्यात आले आहे. खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमधून याची घोषणा केली. भारताचे आयात शुल्क जगातील सर्वाधिक असल्याचा आणि भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर लष्करी साहित्य व ऊर्जा खरेदी केल्याचा उल्लेख त्यांनी केला. हे शुल्क १ ऑगस्टपासून लागू होईल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानमंडळात मोबाईलवर तब्बल आठ ते बावीस मिनिटे पत्ते खेळत असल्याचा चौकशी अहवाल समोर आला आहे. रोहित पवारांनी ट्विट करून ही माहिती दिली. धनंजय मुंडेंना कृषी घोटाळ्यात मिळालेल्या क्लीन चिटविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल होणार आहे. सुरेश धस यांनी प्रधान सचिवांना पत्र पाठवले आहे. सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मुक्तीप्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश योग्यच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावावर जया बच्चन यांनी राज्यसभेत आक्षेप घेतला. शिर्डीत साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेल्या नऊ चांदीच्या नाण्यांवरून वाद सुरू आहे. रशियातील भूकंपानंतर जपानच्या उत्तर भागात त्सुनामी आली. इस्रोचा सर्वात आधुनिक उपग्रह निसारचे श्रीहरीकोटामधून प्रक्षेपण झाले.