Truck Driver Strike : महाराष्ट्रातील मालवाहतूकदारांचा संप मागे घेण्याचा निर्णय
Truck Driver Strike : मागील दोन दिवसांपासून राज्यासह देशभरात सुरू असलेल्या संपावर तोडगा निघाला आहे. केंद्रीय गृह सचिवांसोबत ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे शिष्टमंडळाची चर्चा झाली. या चर्चेअंती नवीन मोटर वाहन कायद्यातील (New Motor Vehicle Act) शिक्षा आणि दंडाच्या नव्या तरतुदी लागू होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मालवाहतूकदार, टँकर चालकांचा संप मागे घेतला जाणार आहे. बुधवारपासून मालवाहतूक सुरळीतपणे सुरू होईल, असा अंदाज आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसनेह चालकांना वाहतूक तात्काळ सुरू करण्याचे आवाहन केले आहे.