Trimbakeshwar Devotee Rush | विविध मार्गांवरुन 290 बस त्र्यंबकेश्वरला धावणार

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. देशभरातून हजारो भाविक ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. भाविकांची ही वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने नाशिकवरून त्र्यंबकेश्वरसाठी जादा बसेसचे नियोजन केले आहे. आज आणि उद्या विविध मार्गांवरून एकूण २९० बसेस त्र्यंबकेश्वरला धावणार आहेत. यामध्ये नाशिक ते त्र्यंबक १९०, अंबोली ते त्र्यंबक १०, पाहुण्या ते त्र्यंबक १०, घोटी ते त्र्यंबक १० आणि खंबाळे ते त्र्यंबक ५० अशा एकूण २७० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर येथे खासगी वाहनांना बंदी असल्याने भाविक मोठ्या संख्येने राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेचा लाभ घेत आहेत. नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानक परिसरातून या जादा बसेस सुटत आहेत. या गर्दीचा आढावा एबीपी माझाचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी घेतला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola