Kokan Railway :कोकणातला प्रवास प्रदूषणमुक्त होणार,विद्युतीकरणाचं काम पुढील महिन्यात पूर्ण
Continues below advertisement
कोकण रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पुढील महिन्यात पूर्ण होणार असून कोकणातला प्रवास आता वेगवान आणि प्रदूषणमुक्त होणार आहे. २०१५ साली तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या काळात या प्रकल्पाला सुरुवात झाली. या प्रकल्पासाठी एकूण १ हजार २८७ कोटींचा खर्च झालेला आहे. एकूण ७३८ किलोमीटर्स मार्गाचं विद्युतीकरण झाल्यास कोकण रेल्वेवर इंधनासाठी लागणारे १५० कोटी रुपये वाचणार आहेत. यापूर्वी दिवा-रत्नागिरी एक्स्प्रेस विजेच्या इंजिनाच्या सहाय्यानं धावली होती. हा प्रकल्प पूर्ण झाला की कोकण रेल्वे सारख्या स्वायत्त महामंडळाने स्वातंत्र्यानंतर पूर्ण केलेला हा पहिला मोठा प्रकल्प ठरणार आहे.
Continues below advertisement