Travel Agent : ट्रॅव्हल एजंट अवैध सावकारीच्या कचाट्यात ABP Majha
Continues below advertisement
आपल्यापैकी एखाद्यानं २ लाखांचं कर्ज घेतल्यावर परतफेड करताना आपण किती रक्कम भरु.... तीन लाख? चार लाख? पाच लाख?... खरं तर ही रक्कम देखील अवाजवीच म्हणायला हवी... मात्र धुळ्यात २ लाखाच्या कर्जाची परतफेड करताना एका ट्रॅव्हल एजंटनं सावकाराला तब्बल २२ लाख रुपये मोजलेत.. मात्र तरीही सावकाराचं पोट न भरल्यानं त्यांनी ट्रॅव्हल एजंटच्या दुकानावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय.. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर निलेश हरळ, गणेश बागुल आणि वाल्मिक हरळ या तिघांविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. मात्र अशा प्रकारे अवैध सावकारी करायची हिम्मत होतेच कशी असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झालाय...
Continues below advertisement
Tags :
Debt Travel Agent Lender Nilesh Haral Ganesh Bagul Valmik Haral Dhule City Crime In Police Station+