Ratnagiri Vashishti River : सप्टेंबरपासून वाशिष्टी नदीच्या नव्या पुलावरून वाहतूक करता येणार
मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या वाशिष्टी नदीवरील नवा पुल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात वाहतूकीसाठी खुला येणार आहे. कित्येक वर्षे चौपदरीकरणाच्या कामात या पुलाचे काम रखडलेले होते. रखडलेल्या कामामुळे जीर्ण अस वाशिष्टी नदी लेल्या पुलावरून सध्या वाहतूक सुरु होती. परंतु हा जुना पुल धोकादायक होता. गेल्या महिन्यात महापुरात या पुलाचा एक भाग ढासळल्यामुळे या पुलावरून दहा दिवस वाहतूक बंद होती. त्याठिकाणी भराव टाकून जुना पुल वाहतूकीसाठी तात्पूरता चालू करण्यात आला. त्याच्याच बाजूला नवीन पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरु असून अखेर काम अंतिम टप्प्यात आले आहे.