Train Fire | भादली स्थानकाजवळ लखनौ-मुंबईपुष्पक एक्सप्रेसला आग, तातडीने नियंत्रण
जळगावच्या भादली स्थानकाजवळ लखनऊ मुंबई Pushpak Express ला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. Pushpak Express च्या S4 बोगीला किरकोळ आग लागली होती. रेल्वे तातडीने थांबवण्यात आली आणि आग नियंत्रणात आणण्यात आली. भुसावळकडून जळगावकडे जात असताना बोगीतून धूर निघू लागला. ही बाब लक्षात येताच लोको पायलटने भादली स्थानकाजवळ गाडी थांबवली. आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यात आले. ही आग किरकोळ स्वरूपाची होती. या घटनेमुळे कोणतीही मोठी हानी झाली नाही. रेल्वे प्रशासनाने त्वरित कार्यवाही करत परिस्थिती हाताळली.