Toxic Cough Syrup | विषारी कफ सिरपचा साठा जप्त, २२ बालकांच्या मृत्यू

Continues below advertisement
बीड, परळी, गेवराई आणि आष्टी येथून 'Respi Fresh Cough Syrup' च्या पाचशे बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली आहे. पुण्यातील एका एजन्सीकडून या सिरपचा पुरवठा झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशात या कप सिरपच्या सेवनामुळे बावीस बालकांचा मृत्यू झाला होता. इतर राज्यांमध्येही अशा घटना घडल्या आहेत. अनेक राज्यांनी या कप सिरपवर बंदी घातल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही या संदर्भात पावले उचलली होती. आता बीडमध्ये विषारी कप सिरपचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे कप सिरप कुठकुठल्या मेडिकल स्टोअरमध्ये पुरवले गेले होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. जप्त करण्यात आलेल्या बाटल्यांची संख्या पाचशे आहे. हे कप सिरप अहमदाबाद येथील कंपनीचे आहे. "मध्य प्रदेशात ज्या ठिकाणी या कप सिरप मुळे जवळपास बावीस बालकांचा मृत्यू झालेला होता तेच कप सिरप जे आहे ते बीड मध्ये आढळून आलेलं आहे." अन्न औषध प्रशासन विभागाने या सिरपचा पुरवठा थांबवला असून, सर्व बाटल्या परत मागवण्यात आल्या आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola