Dudhsagar Waterfall : दूधसागर धबधब्यावर जाण्यास मनाई, पोलिसांनी पर्यटकांना रोखलं
Continues below advertisement
चेन्नई एक्स्प्रेस सिनेमामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला दूधसागर धबधबा पाहायला जाण्यास रेल्वे पोलिसांनी बंदी घातली आहे. परिसरात चांगला पाऊस झाल्यानं धबधबा पूर्णपणे प्रवाहित झालाय.. शनिवारी आणि रविवारी हा धबधबा पाहण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारो पर्यटक येत असतात.. पण रेल्वे खातं आणि वन-खात्यानं धबधब्याकडे जाण्यास बंदी घातली. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झालाय... शनिवारी काही उत्साही तरुणांनी धबधब्याकडे जाण्याचा प्रयत्न केला होता.. पण रेल्वे पोलिसांनी त्यांना रोखून उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती.. दूधसागर धबधबा परिसरात पूर्वी काही अपघात घडून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. याचपार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बंदी घालण्यात आली आहे....
Continues below advertisement