Lunar Eclipse Chandra Grahan 2025|'ब्लड मून' पाहण्याची सुवर्ण संधी;चंद्रग्रहण किती वाजता होणार सुरु?

Continues below advertisement
आज रात्री ९ वाजून ५७ मिनिटांपासून मध्यरात्री १२ वाजून १२ मिनिटांपर्यंत खग्रास चंद्रग्रहण अनुभवता येणार आहे. हे ग्रहण तब्बल पाच तास सत्तावीस मिनिटे असेल. यंदाच्या वर्षी भारतामधून फारसे ग्रहण दिसले नव्हते, त्यामुळे या चंद्रग्रहणाबद्दल अधिक उत्सुकता आहे. सप्टेंबर महिन्यात गणेश विसर्जन आणि चंद्रग्रहण असा तब्बल तीन दशकांनंतरचा खगोलीय योग जुळून आला आहे. १९९७ नंतर पहिल्यांदाच सप्टेंबर महिन्यात खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. रात्री ११ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेमध्ये येईल, त्यावेळी ते नेहमीसारखे प्रकाशित न दिसता लालसर, तपकिरी रंगाचे दिसेल. याला 'ब्लड मून' असेही म्हटले जाते. हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. चंद्रग्रहणामुळे राज्यभरातील देवस्थानांमधील धार्मिक कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. शिर्डीच्या साई मंदिरात दररोज रात्री साडे दहा वाजता होणारी शेजारती आज सव्वानऊ वाजता होईल, त्यानंतर मंदिर दर्शनासाठी बंद राहील. कोल्हापूरमध्ये शेजारती होणार नाही, मात्र ग्रहणकाळात मंदिर सुरू राहील. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात शेजारती ग्रहण संपल्यानंतर केली जाईल. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्योपचारांमध्ये बदल केला जाईल. शनिशिंगणापूर, नाशिकसह राज्यभरातील अनेक मंदिरं आणि धार्मिक स्थळं बंद राहतील. भारतामध्ये ग्रहणाला धार्मिक महत्त्व मोठे आहे, तर खगोलप्रेमींसाठी ही एक आगळीवेगळी पर्वणी ठरेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola