Naxal Surrender: 'मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच आत्मसमर्पण करू', म्होरक्या भूपतीसह ६० माओवादी गडचिरोलीत शरण
Continues below advertisement
गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून, माओवाद्यांचा म्होरक्या मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती (Malloujula Venugopal Rao alias Bhupathi) याने आपल्या ६० सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत हा औपचारिक आत्मसमर्पण सोहळा पार पडणार आहे. 'मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आत्मसमर्पण करू,' असं भूपतीने आधीच जाहीर केले होते. भूपतीवर विविध राज्यांमध्ये मिळून सुमारे ६ कोटी रुपयांचे बक्षीस होते. छत्तीसगड किंवा तेलंगणामध्ये आत्मसमर्पण करण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत त्याने महाराष्ट्रात पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. गडचिरोली पोलीस आणि गृह विभागाच्या अनेक दिवसांच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून, या घटनेमुळे गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त होण्याची आशा निर्माण झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement