TOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 May 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 May 2024 : ABP Majha

राज्यातल्या १८ जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ, १८ जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांपुढे.
यवतमाळचं तापमान ४५ अंशांवर, तर जळगावचा पारा ४३ अंशांच्या पुढे, वाढत्या तापमानामुळे नागरिक हैरान
वर्धा जिल्ह्याचं तापमान ४४ अंशांवर, उन्हामध्ये बाहेर निघू नये तसेच उन्हापासून संरक्षण करण्याचे गाईडलाईन प्रशासनाकडून जारी.
पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, भटुंबरे परिसरात वीज पडून एका महिलेचा मृत्यू, अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष सुरु करण्यात येणार, दुर्घटना घडल्यास अपघातग्रस्तांना मदतीसाठी आपत्कालीन कक्ष १ जूनपासून कार्यान्वित होणार.

बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने असलगाव बाजारसमितीच्या शेडवरचं छत उडालं, शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल भिजल्याने मोठं नुकसान. 

सोलापुरात शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा,  तर ग्रामीण भागात काही ठिकाणी तब्बल 10 ते 12 दिवसाआड पाणीपुरवठा, नागरिकांच्या सोयीसाठी काही ठिकाणी बोअरवेलची सुविधा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram