TOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 25 May 2024 : ABP Majha
TOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 25 May 2024 : ABP Majha
सलग दुसऱ्या दिवशी विदर्भाचे तापमान 45 अंशांच्या पार, अकोल्यात सर्वाधिक 45.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, वर्धा , वाशीम , यवतमाळ, अमरावतीचं तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर.
भंडाऱ्यात उष्णतेचा पारा ४२ अंशावर, प्रखर उन्हामुळे नागरिकांकडून स्कॉर्फचा वापर.
परभणीचं तापमान ४३ अंशावर, यंदाच्या मोसमात दुसऱ्यांदा तापमान ४३ अंशांपार.
अमरावतीच्या मेळघाटात हंडाभर पाण्यासाठी आदिवासींची पायपीट, टँकरद्वारे विहिरीत टाकलेलं पाणी पिण्यासाठी वापरण्याची वेळ.
मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेत घेतली बैठक, मुंबईचे पालकमंत्री केसरकर, मंगलप्रभात लोढा यांच्यासह महापालिका आणि पोलीस आयुक्तांची बैठकीला उपस्थिती. दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारणकरण शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही, फडणवीसांची टीका, तर शरद पवार आणि विरोधी पक्ष नकारात्मक मानसिकतेत गेल्याचीही फडणवीसांची टीका.