TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 25 June 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 25 June 2024 : ABP Majha

संसदेत आज राज्यातला २९ खासदारांचा शपथविधी, नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठीही आज उमेदवारी अर्ज
लोकसभेतील विरोधी पक्षनेता आज ठरणार, राहुल गांधींच्या नावासाठी काँग्रेस आग्रही
रवींद्र वायकरांना खासदारपदाची शपथ घेऊ देणार नाही, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांचा इशारा, आज वायकरांच्या शपथविधीकडे राज्याचं लक्ष
भंडाऱ्यात शासकीय कार्यक्रमाला फडणवीसांना आमंत्रण नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही डावलल्याचा आरोप, महायुतीतली नाराजी चव्हाट्यावर
 इंडिया आघाडीच्या खासदारांची सकाळी १० वाजता बैठक, लोकसभा अध्यक्षपदाची ठरणार रणनीती
महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी बैठक, विधानसभा जागावाटप आणि रणनीतीवर चर्चा होणार
अजित पवारांसोबतच्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाही, शरद पवारांची एबीपी माझाला माहिती, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आमदार परत येण्याचा पवारांना विश्वास
लातूर नीट पेपरफुटीप्रकरणी दुसरा आरोपीही अटकेत...पोबारा केलेल्या संजय जाधवच्या लातूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी, अल्पवयीन मुलाच्या आत्याच्या याचिकेवर निर्णयाची शक्यता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram