TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :24 डिसेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :24  डिसेंबर 2024 : ABP Majha 

राज्याच्या मंत्रिमडळात स्थान मिळेल या आशेने गेलेल्या आमदारांना मंत्रिपदानंतर पालकमंत्रीपद तरी देतील अशी आशा होती. पण आधी कबुल करून ऐनवेळी तेही न दिल्याने आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडाऱ्याच्या पवनीत झालेल्या प्रचार सभेत मतदारांना आवाहन करताना भोंडेकरांना भरघोस मतांनी निवडून द्या, त्यांना पालकमंत्री करू असं शब्द दिला होता. स्थानिक पालकमंत्री मिळेल या अपेक्षेनं नागरिकांनी भोंडेकरांना तब्बल 35 हजारांपेक्षा अधिक मताधिक्यांनी निवडून दिलं. मात्र, महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि नरेंद्र भोंडेकरांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळं शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांनी शिवसेनेचं उपनेतेपद आणि पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देत पक्षश्रेष्ठींवर नाराजगी व्यक्त केली.   हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात शिवसेना नेते शिंदे यांनी शिंदे यांनी भोंडेकर यांना योग्य तो सन्मान होईल असा शब्द दिलाय. त्यामुळं आता आमच्या मनात जो राग होता तो विषय आता संपलाय, असा युटर्न भोंडेकर यांनी घेतला असून आता ते श्रद्धा आणि सबुरीची भाषा बोलू लागले आहेत.  काय म्हणाले भोंडेकर? स्थानिक पालकमंत्री होईल, असा शब्द शिंदे साहेबांनी दिलाय.स्थानिक पालकमंत्री व्हावा, हा मुद्दा आमचा नेहमी राहणार आहे. काही दिवस थांबा,योग्य सन्मान आपल्याला निश्चित दिसेल. जुन्या गोष्टी विसरायला पाहिजे. नवीन गोष्टींकडं लक्ष द्यायला पाहिजे.  आपण नवीन वर्षात पदार्पण करतोय. जुन्या गोष्टी विसरायला पाहिजे.शिंदे साहेबांनी बोलावून, योग्य तो सन्मान होईल असा शब्द दिलाय. आमच्या मनात जो राग होता तो विषय आता संपलाय.स्थानिक पालकमंत्री व्हावा, ही आमची इच्छा आहे. आणि जोपर्यंत तो होत नाही तो आमचा मुद्दा राहणार आहे. येत्या कालावधीत नक्कीचं जिल्ह्याचा पालकमंत्री होईल, असा शब्द शिंदे साहेबांनी दिलाय आणि तो पूर्ण होईल असा विश्वास आहे.काही गोष्टी ज्या आतल्या आहेत, त्या आतचं राहू द्यायला पाहिजे.काही दिवस थांबा.योग्य सन्मान आपल्याला निश्चित दिसेल. असे ते म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram