TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 22 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 22 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

पुणे-बंगळुरु महामार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी रात्री एका वाहनातून पाच कोटी रुपयांची रक्कम हस्तगत केली. विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता असताना कारमध्ये पॅकबंद बॉक्समध्ये पाच कोटी रुपयांची रक्कम सापडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.  पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच कोटी रूपयांची रोख रक्कम (5 Crore Cash Siezed From Car) पकडली. पोलीसांनी रक्कम जप्त केली. मात्र ज्यांच्याकडे रक्कम होती त्यांची चौकशी करुन त्यांना सोडून देण्यात आले. पाच कोटी जप्त केल्यानंतर पोलीस चौकीत ही रक्कम नेण्यात आली आणि निवडणूक विभागाचे अधिकारी,  प्रांताधिकारी आणि आयकर विभाग अधिकाऱ्यांना पोलीस चौकीत कारवाईसाठी पाचारण करण्यात आलं.   गाडी कोणाच्या नावावर? कारवाईची माहिती गुप्त राखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाच कोटी रुपयांची रक्कम कुठुन आली होती, कुठे निघाली होती आणि हे पाच कोटी रूपये कोणाचे आहेत?, याची माहिती देण्यास ना पोलीस , न प्रांताधिकारी ना निवडणूक विभागाचे अधिकारी, ना आयकर विभागाचे अधिकारी तयार झाले. दरम्यान ज्या गाडीसह ही रक्कम जप्त करण्यात आली, ती गाडी  MH 45 AS 2526 या क्रमांकाची असून ती सांगोल्यातील अमोल नलावडे नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram