TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 1 June 2024 : ABP Majha

पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवालला अटक, पुरावे नष्ट करण्यात मदत केल्याचा आरोप 

पुणे अपघातप्रकरणी आज पुणे पोलीस अल्पवयीन मुलाची चौकशी करणार, बाल न्याय बोर्डाच्या सदस्याच्या उपस्थितीत दोन तास चौकशी करण्याची परवानगी

मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकचा आज दुसरा दिवस, लोकल केवळ परळ आणि भायखळा स्थानकांपर्यंतच धावणार, तर ५३४ लोकल रद्द

शरद पवारांच्या पक्षातला मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत, सुनील तटकरे यांचा दावा, एबीपी माझाची EXCLUSIVE बातमी 

४ जूननंतर राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता, काही मंत्रांची खाती बदलणार... तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती... 

लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान, पंतप्रधान मोदी, कंगना रनौत, अभिषेक बॅनर्जी यांच्या मतदारसंघात मतदार बजावणार हक्क 

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी आज सर्वात मोठा एक्झिट पोल, आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून फक्त एबीपी माझावर

इंडिया आघाडीची आज नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक, आतापर्यंत झालेलं मतदान आणि पुढील रणनीतीवर चर्चा करणार, शरद पवार राहणार उपस्थित

पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा आज संध्याकाळी संपणार, ४५ तासांच्या ध्यानानंतर तिरुवल्लूवार यांचं दर्शन घेणार 

अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी, उद्या दुपारी ३ वाजता शरण जाणार केजरीवाल

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola