TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 28 ऑगस्ट 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शरद पवार पक्ष आक्रमक, आज भिगवण चौकात सुप्रिया सुळे करणार आंदोलन
खासदार नारायण राणे आज राजकोट किल्ल्यावर जाणार, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार.
नशीब उद्घाटनाच्या वेळेला महाराजांचा पुतळा पडला नाही, नाहीतर अनेकांचे जीव गेले असते, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया.
नौदलाच्या दोन अधिकाऱ्यांकडून शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी, पुतळा कोसळल्याचा स्वतंत्र अहवाल तयार करून तो नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवला जाणार.
समुद्रकिनारी असणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज नौदलाला आला नसावा, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, तर यावर कुणीही राजकारण न करण्याचं, फडणवीसांचं आवाहन.
शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या झालेल्या अपमानाविरोधात राष्ट्रवादी मैदानात, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज घटनास्थळी जाणार.
आप-आपल्या शहरातील शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाराजांची जाहीर माफी मागा. जितेंद्र आव्हाड यांचं मविआच्या कार्यकर्त्यांना आवाहन.
आज छत्रपती संभाजी महाराज असते तर भ्रष्टाचारी लोकांचा उजवा हात आणि डावा पाय निकामी केला असता, पुतळा उभारतांना कोणी पैसा खाल्ला असेल तर कठोर कारवाई झाली पाहिजे, अमोल मिटकरींची टीका.
मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य अत्यंत अशोभनीय, आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया, मुख्यमंत्र्यांना ठेकेदार आणि भ्रष्टाचारसोडून काही माहिती नाही, नाईक यांची टीका.