
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 21 March 2025 : ABP Majha
नागपूर हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी फहीम खानसह 36 आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार, सर्व आरोपींना कोर्टानं दिली होती २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
नागपुरात मशिदींच्या बाहेर सुरक्षेत वाढ, रमजान त्यात शुक्रवार म्हणजे जुम्मा असल्याने पोलिसांकडून खबरदारी, चौकाचौकात बंदोबस्त.
नागपुरातील हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली, पोलिसांनी जवळपास ३७८ अश्रू धुराचे गोळे डागल्याची माहिती.
नागपूर हिंसाचारापूर्वी काही तरुणांनी रेकी केल्याचा संशय, तरुणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.
संचारबंदीमुळे मध्य नागपुरातील बाजारपेठा बंद, गेल्या 3 दिवसात सुमारे 400 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज, महाल, चिटणीस पार्क, भालदारपुरा, हंसापुरी, इतवारी, या सर्व भागात नागपुरातील महत्त्वाच्या बाजारपेठा
औरंगजेबाच्या कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर एनआयएचं पथक संभाजीनगरमध्ये दाखल, खुलताबाद परिसराची केली पाहणी, जालना, परभणी, नांदेडमधील हालचालींवरही लक्ष.
नागपूर हिंसाचारानंतर छावा सिनेमावर बंदीची मागणी, नागपूर राड्याला छावा कारण झाल्याचा आरोप करत मौलानांची अमित शाह यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
नागपूरच्या दंगलग्रस्त भागाच्या पाहणीसाठी काँग्रेसकडून समितीची स्थापना. समिती दंगलग्रस्त भागात जाऊन स्थानिकांशी चर्चा करणार. माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, आमदार साजिद पठाण यांचा समावेश.