TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 July 2024 : ABP Majha
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी भेट, जागावाटप आणि इतर विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता.
गौतम अदानी-मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बैठक
सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी तीन वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार, बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार.
स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींनी घेतली मनोज जरांगेंची भेट, दीड तास दोघांमध्ये चर्चा, चळवळीतली माणसं एकत्र आल्यावर केवळ तब्येतीची चर्चा होते असं नाही, राजू शेट्टींची भेटीनंतर प्रतिक्रिया.
आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, तर पुणे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा नेमका काय परिणाम झाला याची माहिती घेणार.
प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज बीड जिल्ह्यात दाखल होणार, अंबाजोगाई, केज, कपिलधारमधून ही यात्रा चौंडी इथं जाणार.
शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर तेल ओतण्यासाठी उतरलेत, शाहु-फुले-आंबेडकरवाद्यांना उचकवण्यासाठी पवारांनी नामांतराचा मुद्दा काढला का, प्रकाश आंबेडकरांचा सवाल.
विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही पण त्यानंतर धक्का बसेल, लातूरमधील भाषणादरम्यान प्रकाश आंबेडकरांचं भाकीत.