TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 28 July 2024 : ABP Majha…

Continues below advertisement

 विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता. पश्चिम किनारपट्टीवर गुजरात ते केरळदरम्यान समुद्रसपाटीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय 

मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून मुंबईला यलो अलर्ट, तर उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचाही अंदाज. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये ७१ टक्के पाणीसाठा, तुळशी, मोडक सागर आणि विहार धरणांत १०० टक्के पाणीसाठा.

सांगलीतील कृष्णा नदीची पातळी ४०.२ फुटांवर, पुराचा धोका नसला तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा कायम. 

कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचा राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद, कोल्हापूरकरांना मोठा दिलासा.

कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी, कुरुंदवाडच्या अनेक भागातील घरं पाण्याखाली,  कुरुंदवाड बसवाड कवठेसार भागातील ५० हून अधिक कुटुंबांचं स्थलांतर.

अलमट्टी धरणामधून सव्वातीन लाख पाण्याचा विसर्ग , यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत एक इंचाने घट.  

अहमदनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱं मुळा धरण ५५.३० टक्के भरलं, आठवडाभर कोसळलेल्या पावसामुळे मुळा धरणात पाण्याची आवक सुरु. 

पानशेत धरण ९४ टक्के भरलं, पाणीसाठा वाढल्यानं सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram