TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 July 2024 : ABP Majha…

Continues below advertisement

गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल 239 मिलिमीटर इतका पाऊस बरसला आहे. म्हणजे 9.41 इंच इतका पाऊस कोसळला आहे. या 1 जून पासून 3210 मिलीमीटर इतका पाऊस बरसला आहे, गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2760 मिलीमीटर पावसाची (Heavy Rain) नोंद झाली होती. रात्री पासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे. 

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद 

शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, घोकायदायक ठिकाणे पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील खेड, जुन्नर आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा परिसरातही मुसळधार पाऊस पडला आहे. या ठिकाणच्या सर्व शाळांना सुटी देखील देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिसरात खासगी ऑफिसना आदेश दिल्यानंतर सुटी जाहीर करण्यात आली. सर्व सरकारी कार्यालये सुरू आहेत. मुळशी तालुक्यात ताम्हिणी घाटात दरड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. त्यामुळे ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram