Top 80 | सकाळी आठच्या 80 बातम्या सुपरफास्ट आढावा 23 July 2024 ABP Majha
आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार, यंदाचा अर्थसंकल्प ४७ लाख ६५ हजार ७६८ कोटींचा असणार.
आजच्या अर्थसंकल्पाकडे विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वाचं लक्ष, शेतकऱ्यांना कोणत्या विशेष सवलत मिळणार, महिला वर्गाला कोणत्या सुविधा मिळणार याकडे लक्ष
राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्र प्रकरण, आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय होणार याकडे लक्ष.
दिल्लीत आज काँग्रेसची बैठक, विधानसभेचं जागावाटप आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाईसंदर्भात बैठक आयोजित. नाना पटोले, वडेट्टीवार बैठकीला जाणार.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार, तसेच निवडणुकीसाठी राज्यातील दौरा जाहीर करणार.
आज अहमदनगरमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा, पाथर्डीमध्ये सभेचं आयोजन.
सह्याद्री अतिथीगृहातील बैठक संपताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठक, मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न राज्यातील तेढ सोडवण्याच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक
फडणवीसांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत भाजपकडून काढण्यात येणाऱ्या संवाद यात्रेवर चर्चा, कोणत्या नेत्याने कोणत्या भागाचा दौरा करायचा यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती.