TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 02 August 2024 : ABP Majha

Continues below advertisement

सातारा जिल्ह्यातील सर्व  पर्यटनस्थळे आणि धबधबे चार दिवस पर्यटकांसाठी बंद. महाबळेश्वरमधील सर्व पाँइंट्सही बंद. हवामान खात्याच्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. 

पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, मुठा नदीपात्रात ११ हजार ४०७ क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग सुरु.  

आपापसातील वादानंतर आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एका कार्यक्रमात एकत्र येण्याची शक्यता, नागपुरातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आज उद्घाटन सोहळा.  

गुहागर विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा, तर शिंदे गटाचे रविंद्र फाटक यांच्याकडूनही मतदारसंघात चाचपणी, ठाकरे गटाचे भास्कर जाधव या मतदारसंघाचे विद्यमान आमदार. 

कल्याणमधील भाजप बुथप्रमुखाच्या मोबाईल शॉपवर गोळीबार, अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात जयेश भोईर आणि पद्माकर मल्ला थोडक्यात बचावले. 

अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये आरक्षण, सुप्रीम कोर्टाची मंजुरी, क्रिमी लेयरची मर्यादा ओलांडणाऱ्यांना ओळखून त्यांचा आरक्षणाचा अधिकार काढून घ्यावा, कोर्टाचा निर्णय.  

लातूरच्या उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्याकडून अनुसूचित जाती, जमाती बाबतच्या कोर्टाच्या निर्यणाचं स्वागत, समाजातील छोट्या-छोट्या वंचित घटकांना निर्णयाचा लाभ होईल अशी प्रतिक्रिया.  

अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींबाबतच्या महत्वपूर्ण निकालामुळे समाजाला फायदा होईल, भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्याकडून विश्वास व्यक्त. 

एससी एसटी वर्गीकरण करण्याचा दिलेला निर्णय वादग्रस्त, सर्वोच्च न्यायालयाने निकालाचा पुनर्विचार करावा, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram