TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 सप्टेंबर 2024 : ABP Majha
कोल्हापूर ते पुणे आणि हुबळी ते पुणे अशा दोन स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील, १६ सप्टेंबरपासून या मार्गावर वंदे भारत धावणार.
16 सप्टेंबरची ईदची शासकीय सुट्टी 18 सप्टेंबरला दिली जाणार, 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असल्याने मुस्लिम बांधवांनी 18 सप्टेंबरला जुलूस काढण्याचा निर्णय घेतल्याने मुंबई आणि उपनगरासाठी शासन निर्णय.
कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द केल्यानंतर, निर्यात शुल्कातही केंद्र सरकारकडून कपात, कांद्यावर आता ४० टक्के निर्यात शुल्का ऐवजी २० टक्के शुल्क आकारणी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा.
गतवर्षाच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना १ हजार ६०० कोटी रुपयांची मदत, कृषी आयुक्तांकडून मदतीचे तातडीने वितरण करण्याचे आदेश.
केंद्र सरकारकडून रिफाइंड तेलावरील मूलभूत सीमा शुल्कात वाढ, पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील मूलभूत सीमा शुल्क १२.५ टक्क्यावरुन ३२.५ टक्क्यावर, त्यामुळे तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता.
१ नोव्हेंबर २०२४ पासून सातबारा उताऱ्यावर आईच्या नावाचा समावेश होणार. १ मे २०२४ रोजी जन्म झालेल्या व्यक्तीच्या नावावर खरेदी करायची असेल तर आईचे नाव लावणे बंधनकारक. वडिलांचे नाव लावणे बंधनकारक नाही.
देशात नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान सुुरू होणार. भारतीय हवामान खात्याची माहिती.