TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :06 JULY 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :06 JULY 2024 : ABP Majha 

रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट, गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा.
मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आजपासून शांतता रॅली ((सुरू होणार)), आजपासून ते १३ जुलैपर्यंत ही रॅली  काढणार, १३ तारखेनंतर जरांगे पाटील आपली भूमिका ठरवणार
महायुतीची आज संध्याकाळी बैठक, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि नेते उपस्थित राहणार, विधान परिषद निवडणूक आणि शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचं मार्गदर्शन केलं जाणार.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवतांची भेट..राज्याच्या राजकारणासह विविध विषयांवर चर्चा
विश्वविजेत्या टी-२० टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, सूर्यकुमारच्या कॅचवरून रोहित शर्माची टोलेबाजी..
दोन वर्षांपूर्वी ५० जणांच्या टीमनं काढली विकेट...टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची राजकीय बॅटिंग...
मुख्यमंत्री शिंदे माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार..एक दिवस वारकऱ्यांसह करणार पायी वारी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram