TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 May 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 May 2024 : ABP Majha

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात पाणीटंचाई कायम, पाण्यासाठी  खैरखेडा गावातील नागरिकांची डोंगरकड्या वरून एक किलोमीटरची  पायपीट. 

धुळे शहरासह जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई,  शहरात आठ ते नऊ दिवसानंतर पाणीपुरवठा, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ .

नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील कुलीडाबर इथं भीषण पाणीटंचाई, गावातील महिलांवर विहिरीत उतरुन पाणी भरण्याची वेळ, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. 

गोंदियाच्या पालेवाडीत भीषण पाणीटंचाई, पाण्यासाठी शेतशिवारात महिलांची मैलोन मैल भटकंती, ९५ लाख रुपये खर्चून उभारलेली जल जीवन मिशन योजना सपशेल फोल. 

दुष्काळामुळे जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात, पाणी न मिळाल्याने मोसंबीच्या बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ.
नंदुरबारमध्ये आठवड्याभरापासून वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याची आवक कमी,  आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram