TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 डिसेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24  डिसेंबर 2024 : ABP Majha

महायुतीच्या मंत्र्यांना मुंबईतील मंत्रालयातील दालनांचं वाटप करण्यात आले आहे. मंत्रालयातील चर्चेत असलेलं 602 क्रमांकाचं दालन शिवेंद्रराजे भोसले (Shivendrasinhraje Bhosale) यांना मिळालं आहे. सरकारने जारी केलेल्या जीआरमध्ये त्यांना 601, 602 आणि 604 अशी तीन दालनं शिवेंद्रराजेंना देण्यात आली आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 602 क्रमांकाचे दालन कायम चर्चेत असतं. दरवेळच्या दालन वाटपावेळी हे समोर येतं की ते दालन घेण्यासाठी कोणतेही मंत्री उत्सुक नसतात. कारण या दालनाबद्दल शुभ-अशुभ अशी चर्चा कायम चर्चेत असते. या दालनात आलेला मंत्री पुन्हा मंत्री होत नाही, असं 2014 पासून पाहायला मिळतं. खरंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनानंतर हे सर्वात मोठं दालन आहे. पण तिथे कोणीही जाण्यास तयार होत नाही. त्यामुळे आता शिवेंद्रराजे भोसले हे दालन स्विकारणार का हे पाहावं लागेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram