TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 23 डिसेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 23 डिसेंबर 2024 : ABP Majha

पुण्यातील वाघोलीमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची समोर आली आहे. वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ पुण्याकडून येणाऱ्या भरघाव बिल्टवेस् इंटरप्राईजेस कंपनीच्या डंपरने (Pune Dumper Accident) फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मुलांच्या काकांसह दोन बालकांचा समावेश आहे. तर सहाजण गंभीर जखमी झाले. जखमीमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच ही घडली. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती समोर आली आहे.   नेमकं काय घडलं? केसनंद फाट्यावर फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे. फूटपाथवर एकूण 12 जण झोपले होते. तर बाकी फूटपाथच्या बाजूला झोपड्यात झोपले होते.भरघाव डंपर सरळ फूटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावर गेला. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  जखमीमधील तिघांची प्रकृती चिंताजनक- जखमीमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील वाघोलीतील केसनंद फाटा येथे घडली. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. वैभवी रितेश पवार ( वय 1 वर्ष ), वैभव रितेश पवार (वय 2 वर्ष),  रीनेश नितेश पवार (वय 3) वर्षे अशी मृत्युमुखी झालेल्यांची नावे तर इतर सहाजण जखमी आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram