TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 13 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 13 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा जोमाने धडाडू लागल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांचे नेते जोरदारपणे प्रचाराच्या मैदानात उतरले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गजांची फौज महाराष्ट्रात प्रचारसभा घेत आहेत. एमआयएम पक्षानेही छत्रपती संभाजीनगरसह मुंबई, सोलापूर आणि काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यासाठी, प्रचाराला वेग आला असून एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी जाहीर सभा घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. मुंबईतील कुर्ला मतदारसंघातील एमआयएमच्या उमेदवार आसमा शेख यांच्यासाठी असदुद्दीन ओवैसी (Asaduddin owaisee) यांची जाहीर सभा झाली, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीमधील नेत्यांवरही हल्लाबोल केला. मुंबईतील सभेतून मुस्लीम समुदायाच्या प्रश्नावर भाष्य करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही टीकेची झोड उठवली. वक्फ बोर्ड आणि बाबरी मस्जीदच्या मुद्द्यावरुन मुस्लीम समाजाला आवाहन केलं.