TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 28 डिसेंबर 2024 : ABP Majha
संतोष देशमुखांसाठी बीडमध्ये आज विराट मोर्चा, देशमुखांना न्याय मिळावा यासाठी अनेक नेते मोर्चात सहभागी होणार, यात बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजी राजे भोसले आणि मनोज जरांगेंसह अनेक नेत्यांचा सहभाग.
संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणातील फरार असलेल्या ३ आरोपींची हत्या झाल्याचा अंजली दमानियांचा आरोप, हत्येची माहिती देणारा फोन आल्याचा दमानियांचा दावा.
१९ दिवसानंतरही आरोपींना पकडलं का नाही?, बीडच्या घटनेवरून नरेंद्र पाटलांचा सरकारला सवाल,
यंत्रणेवर विश्वास ठेवला, पण आरोपी मोकाट, मृत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांचं वक्तव्य,.
धनंजय मुंडेंना मंत्री करू नका, त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, हे सांगणारा मी पहिला होतो संभाजीराजेंचं वक्तव्य, तर मुंडेंच्या राजीनाम्याचीही केली मागणी.
बीडमधील मोर्चा एखाद्या समाजाच्या विरोधात नाही तर घटनेच्या विरोधात आहे, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची प्रतिक्रिया.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत धनंजय मुंडें आणि पंकजा मुंडेंच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्या, रेणापूरमधील आक्रोश मोर्चाची तहसीलदारांना निवेदन देत मागणी.
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळाल्यानं असुयेतून सुरेश धस त्यांना लक्ष्य करतायत, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा गंभीर आरोप, धस यांना मुंडेंची सुपारी कुणी दिली याता तपास करण्याची गरज, मिटकरींचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंना केवळ पालकमंत्रिपद दिसतंय, त्यांचं पालकमंत्रिपद त्यांना लखलाभ, सुरेश धस यांचं वक्तव्य तर मिटकरींनी माझ्या नादाला लागू नये, धस यांचा इशारा.