TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 7 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 7 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. मुख्यमंत्री शिंदेंसोबत फडणवीसही आज दिल्लीत असणार. 
जागावाटपाबाबत आजपासून महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका, सलग तीन दिवस बैठका घेऊन महाविकास आघाडी जागावाटप अंतिम करणार
हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार. इंदापूरमधील मार्केट कमिटीच्या आवारात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार.
 पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राजवर्धन पाटलांनी घेतली युगेंद्र पवारांची भेट, पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहण्याचं युगेंद्र पवारांना निमंत्रण.
पणन मंत्री अब्दुल सत्तारांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी न ऐकल्याच्या निषेधार्थ आज राज्यातील बाजार समित्या बंद, बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प होण्याची शक्यता 
राज्यपालनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी, महायुती सरकारने मविआची यादी मागे घेणं, बेकायदेशीर असल्याचा याचिकेत आरोप

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram