TOP 80 : सकाळी 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 09 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 80 : सकाळी 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 09 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रातील सात हजार सहाशे कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार. या कार्यक्रमाला मोदी ऑनलाईन उपस्थिती लावणार.
आज विदर्भातील ५ तर राज्यातील एकूण १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. मुंबई, अंबरनाथ, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, वाशिम, भंडारा, हिंगोलीत मेडिकल कॉलेज. 
अमरावतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचं मोदी ऑनलाईन उद्धाटन करणार,  अमरावती जिल्हा नियोजन भवनात कार्यक्रम पार पडणार. 
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिककरांना महाविद्यालयाचं गिफ्ट,  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडणार, दादा भुसे राहणार उपस्थित
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचंही आज भूमिपूजन , कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी ऑनलाइन उपस्थित राहणार.  तर मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री आणि नितीन गडकरी नागपूर विमानतळावर उपस्थित राहतील . 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram