TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 May 2024 : ABP Majha

Continues below advertisement

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी बांधकाम व्यायवसायिक विशाल अगरवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक, दुपारपर्यंत पुण्याला आणणार 

पुण्यातील रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी कठोर कारवाई करा, गृहमंत्री फडणवीसांचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश..तर भरधाव वेगात कार चालवतानाचा नवं सीसीटीव्ही फुटेज समोर

पाचव्या टप्प्यात देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात...राज्यात ५४.३३ टक्के तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७६ टक्के मतदान...

खासदार श्रीकांत शिंदेंच्या कल्याण मतदारसंघात सर्वात कमी मतदान तर दिंडोरीत सर्वाधिक ५७.०६ टक्के मतदान

निवडणूक आयोगाकडून जाणीवपूर्वक मतदानासाठी विलंब, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप...पराभवाच्या भीतीने मोदी सरकार पछाडल्याची ठाकरेंची टीका...तर आशिष शेलारांची निवडणूक आयोगाकडून तक्रार

बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी एक वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार 

राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी.. छत्रपती संभाजीनगर, जालन्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस तर तळकोकणातही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी

आयपीएल प्लेऑफच्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद भिडणार, विजेत्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram