TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 09 June 2024 : ABP Majha

Continues below advertisement

नरेंद्र मोदी आज संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार...तर ५२ ते ५५ मंत्र्यांचा  शपथविधी होण्याची शक्यता, देश-परदेशातील आठ हजार मान्यवरांना निमंत्रण

मंत्रिपद स्वीकारण्याचा खासदारांचा आग्रह श्रीकांत शिंदेंनी नाकारला...पक्षबांधणी आणि विधानसभा निवडणुकीला प्राधान्य देणार असल्याचं केलं स्पष्ट

मराठा समाजाला आपल्याच सरकारनं आरक्षण दिलं होतं, भाजपच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य, तर आरक्षणाच्या बदल्यात भाजपचे १०५ आमदार मराठ्यांनीच निवडून दिले, जरांगेंचा पलटवार...

मुंबई, ठाणे आणि पालघरला यलो अलर्ट, कोकणासह सातारा आणि कोल्हापूरला हवामान खात्याचा ऑरेन्ज अलर्ट, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.

पुण्यात कमी वेळात जास्त पावसाची नोंद, पुण्यातील 
शिवाजीनगरमध्ये सर्वाधिक १०३ मिमी पावसाची नोंद, तर पुढचे तीन दिवस मुसळधार पावासाचा अंदाज

नीटच्या परीक्षेत कोणताही गोंधळ नाही, २३ लाखांपैकी केवळ १६०० जणांचा प्रश्न...केंद्रीय उच्चशिक्षण सचिवांचं स्पष्टीकरण...

टी-ट्वेन्टी विश्वचषकामध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने, न्यूयॉर्कमध्ये सामना रंगणार 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram