TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 1 June 2024 : ABP Majha
लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान, पंतप्रधान मोदी, कंगना रनौत, अभिषेक बॅनर्जी यांच्या मतदारसंघात मतदार बजावणार हक्क
लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी आज सर्वात मोठा एक्झिट पोल, आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून फक्त एबीपी माझावर
पुणे अपघातप्रकरणी आज पुणे पोलीस अल्पवयीन मुलाची चौकशी करणार, बाल न्याय बोर्डाच्या सदस्याच्या उपस्थितीत चौकशी पार पडणार
शरद पवारांच्या पक्षातला मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत, सुनील तटकरे यांचा दावा, एबीपी माझाची EXCLUSIVE बातमी
४ जूननंतर राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता, काही मंत्रांची खाती बदलणार... तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती...
मनसे पदवीधर निवडणूक लढवण्यावर ठाम, अभिजीत पानसे ७ जूनला उमेदवारी अर्ज भरणार, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष...
मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकचा आज दुसरा दिवस, लोकल केवळ दादर आणि भायखळा स्थानकांपर्यंतच धावणार, तर ५३४ लोकल रद्द
पंढरपुरातील आढळलेल्या गुप्त खोलीत विविध प्रकारच्या मुर्ती सापडल्या, मंदिर समितीच्या अध्यक्षांसह पुरातत्व विभागाकडून पाहणी
पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा आज संध्याकाळी संपणार, ४५ तासांच्या ध्यानानंतर तिरुवल्लूवार यांचं दर्शन घेणार