TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 9 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 9 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
हरियाणात सलग तिसऱ्यांदा भाजपचं सरकार,  प्रत्येक जातीच्या, वर्गाच्या लोकांनी भाजपला मतदान केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले हरियाणाच्या मतदारांचे आभार.
देशात एवढ्या निवडणुका झाल्या, पण कुठेही काँग्रेसला दुसरी संधी मिळाली नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका, एकदा लोकांनी काँग्रेसला हाकलल्यानंतर 'नो एन्ट्री'चा बोर्ड लावला, मोदींचा हल्लाबोल.
काँग्रेसने शेतकरी, दलित, ओबीसींना भडकवण्याचा प्रयत्न केला ,पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर आरोप,  भारतीय सेनेबाबतही काँग्रेसने अपप्रचार केला, मोदींचं वक्तव्य.
काँग्रेस नेते राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यावर हरियाणाने पहिली सलामी दिली, दुसरी सलामी महाराष्ट्र देईल, हरियाणा विधानसभेच्या निकालावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर टीका
हरियाणा निवडणूकीसारखा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही. फडणवीसांनी केलेलं भविष्य कधी खरे होत नाही. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram