TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 3 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 3 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात, राज्यातील विविध मंदिरात नवरात्रउत्स मोठ्या उत्साहात पार पडणार.
महाराष्ट्राची कुलस्वामीनी  तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपवून देवी सिंहासनावर विराजमान,  सिंह गाभाऱ्यात तुळजाभवानीची घटस्थापना होणार.
कोल्हापुराच्या अंबाबाई मंदिरात आजपासून आदिशक्तीचा जागर, तोफेला सलामी देऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार.
आज दुपारनंतर माहुरगडच्या रेणुका मंदिरात घटस्थापना होणार, हलत्या दिपमाळेसाठी हे मंदिर प्रसिद्ध. 
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्तीपीठ म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिरात घटस्थापनेची तयारी पूर्ण, देवीच्या आभूषणाची भव्य मिरवणूक काढून त्यानंतर होणार 
विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अमरावतीच्या अंबा देवी संस्थानमध्ये नवरात्रोत्सवाची सुरुवात, पहाटे ५ वाजेपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. 
नवरात्रोत्सवानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. जेजुरी गड रोषणाईनं निघाला नाहून. रोषणाईची ड्रोन दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram