Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 : ABP Majha
Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 : ABP Majha
शिर्डीच्या पुष्पक रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं २ दिवसीय शिबिर, पक्षातील सर्व जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, तालुकाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी शिबिराला उपस्थित राहणार.
शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिराला भुजबळ अनुपस्थित राहणार,प्रकृती अस्वस्थ असल्याने उपस्थित राहणार नसल्याची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्यापासून दावोस दौऱ्यावर, जागतिक आर्थिक परिषदेला फडणवीस उपस्थित राहणार तसेच पाच दिवसांच्या दौऱ्यात महत्त्वाच्या कंपन्यांशी ते गुंतवणूक करार करणार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महापालिका निवडणुकीत मुंबईत ५० पेक्षा जास्त जागा लढण्याच्या तयारीत, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची प्रदेश कार्यालयात बैठक
पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण शरद पवारांची साथ सोडणार, आज शिर्डीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, विधानसभेपूर्वी सतीश चव्हाणांनी सोडली होती दादांची साथ.
नांदेडमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट, निवडणुकांमध्ये गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात न घेण्याची मागणी,मिलिंद देशमुख आणि दिलीप कंदकुर्तेंना पक्षात घेण्यास विरोध.