TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 24 July 2024 : ABP Majha
TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 24 July 2024 : ABP Majha नाशिकमध्ये पावसाची संततधार, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाणी पातळीत वाढ,
नाशिककरांवरील पाणी कपातीचे संकट टळलं. चार दिवसांपासून गडचिरोलीत अतिवृष्टी, अनेक नद्यांना पूर, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांकडून पूरपरिस्थितीची हेलिकॉप्टरमधून पाहणी.
अहमदनगर जिल्ह्याच्या धरणातील पाणीसाठ्यात वाढ, भंडारदरा धरण ५६ टक्के, मुळाधरण ३७ टक्के तर निळवंडे धरणाचा साठा २५ टक्क्यांवर.
दोन दिवसांपासून गोसीखूर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस, धरणाचे ३३ दरवाजे उघडले, ३ लाख ५० हजार ५२४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग.
गोंदियात पावसाच्या जोर कायम, इटियाडोह धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्या धरणात ९८.१७ टक्के जलसाठा असून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता
शहापूरमध्ये धरण क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी, मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण ९७ टक्के भरलं.
माळशेज परिसरात मुसळधार पावसामुळे धबधबे मोठ्य़ा प्रमाणात प्रवाहित, धबधब्याचं पाणी महामार्गावर आल्याने वाहतुकीवर काहिसा परिणाम, धबधब्यावर पर्यटकांची गर्दी.