TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :11 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

विधानसभेच्या २८८ जागांसाठी IANS आणि मॅट्रिझचा ओपिनियन पोल जाहीर, महायुतीला १४५ ते १५६ तर महाविकास आघाडीला १०६ ते १२६ जागा मिळण्याचा अंदाज. 
मुंबईतील एकूण ३६ जागांसाठीचा IANS आणि मॅट्रिझचा ओपिनियन पोल, मुंबईत महायुती मविआपेक्षा वरचढ ठरणार, मुंबईत भाजपला सर्वाधिक जागा मिळणार, पोलचा अंदाज. 
IANS आणि मॅट्रिझच्या ओपिनियन पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रातील 70 जागांपैकी 18 ते 22 जागा भाजपला मिळणार, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 ते 19 आणि राष्ट्रवादीला 8 ते 12 तर ठाकरे गटाला सर्वात कमी जागा मिळण्याचा अंदाज.
मराठवाड्यातही भाजपच मोठा भाऊ ठरणार, ओपिनियन पोलचा अंदाज,तर  शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत काटे की टक्कर होणार.
ओपिनियन पोलनुसार अजित पवारांच्या तुलनेत शरद पवारांना मराठवाड्याचा कौल मिळणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा मिळण्याचा अंदाज.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना आणि धाराशिव दौऱ्यावर, शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या सभा.
देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये, नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात प्रचार रॅलीचे आयोजन.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram