TOP 70 : 07 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 15 Sept 2024 : ABP Majha

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत धनगर आंदोलकांची आज मुंबईत सह्याद्री अतिथी गृहावर बैठक. या बैठकीत धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची प्रमुख मागणीवर तोडगा काढण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज धुळ्याच्या शिंदखेडा दौऱ्यावर, सकाळी एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालयाच्या मैदानावर शेतकरी मेळाव्यात राहणार उपस्थित

उद्धव ठाकरे आज अहमदनगर जिल्हा आणि संभाजीनगरच्या दौऱ्यावर, सकाळी शिर्डीत साईबाबा दर्शनापासून सुरूवात करत अनेक कार्यक्रम आणि मेळाव्यांना हजेरी लावणार.

मविआ चे तिकीट आपल्यालाच मिळणार असा दावा करीत भगीरथ भालके यांची पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील 96 गावांमध्ये जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात. परिणामी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे वातावरण तापण्याची शक्यता. 
 
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांचं तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलन. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं अशी मागणी. आम्ही यापूर्वीच विशेष अधिवेशन बोलवून 10 टक्के आरक्षण दिलंय राजेंद्र राऊतांच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया.

मुख्यमंत्र्यांच्या शिवसैनिक मेळाव्यात तानाजी सावंत अनुपस्थित, या अनुपस्थितीमुळे शिवसेनेत दोन गट तर पडले नाही ना? अशा चर्चांना उधाण.

राजकीय पुढार्‍यांच्या भेटी घेतल्याची बातमी तथ्यहीन असल्याचे डॉ. ज्योती मेटें यांनी म्हटलंय. तर शिवसंग्राम पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि गणेश मंडळांच्या भेटी सुरू असल्यामुळे आपण मुंबईत असल्याचं मेटेंचं स्पष्टीकरण.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram